गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:24 IST)

बिहार : ऑटोमेटिक स्कूटरची मागणी वाढली

honda motor cycle in bihar

बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सदरची वाढ  मोटरसायकलच्या तुलनेत दुप्पट आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष(सेल्स अँड मार्केटिंग) यदविंदर सिंग गुलेरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या सहा वर्षात भारतात स्कूटरच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढलीये. दुसरीकडे बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरच्या मागणीत ४१ टक्क्यांनी वाढ झालीये. यात होंडाच्या स्कूटरची मागणी मोठी आहे. 

गुलेरिया म्हणाले, बिहारमध्ये होंडाच्या स्कूटरची रेकॉर्डब्रेक विक्री झालीये. होंडाने एप्रिल-जून २०१७-१८ दरम्यान ३८,०२३ गाड्यांची विक्री करत बिहारमध्ये सर्वाधिक विक्रीचा रेकॉर्ड बनवला. गेल्या सहा वर्षात होंडाच्या दुचाकी गाड्यांची मागणी ४.५ टक्क्यांनी वाढलीये. बिहार हे होंडासाठी भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य आहे. बिहारमधील लोक आपल्या सोयीसाठी येण्या-जाण्याच्या दृष्टीने स्कूटरला प्रथम प्राधान्य देत आहेत.