गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:19 IST)

मुख्यमंत्री केजरीवालांच्या खासगी कारची चोरी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी कार गुरुवारी दुपारी सचिवालयाजवळून चोरी झाली. केजरीवाल यांच्याकडे निळ्या रंगाची वॅगन-आर कार होती. दोनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेल्या केजरीवाल यांनी याच कारमधून सर्वाधिक प्रवास केला. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होईपर्यंत ते ही कार वापरत होते. सध्या ते शासकीय वाहनाचा (इनोव्हा) वापर करत आहेत. 
 
केजरावाल यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरु केले होते, तेव्हापासून ते या कारचा वापर करत होते. त्यांच्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगाची ही कार साक्षीदार होती. आम आदमी पार्टीच्या एका समर्थकाने 2015 मध्ये दावा केला होता, की त्यांनी 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांना ही कार भेट दिली होती.