शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2017 (17:43 IST)

राहुल गांधीना गुजराती वाचता आले नाही , मग झाली चूक

गुजरात विधानसभेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जोरात प्रचार सुरु आहे. मात्र गुजरातमधील छोटा उदयपूर येथे झालेल्या  सभेनंतर असा प्रकार घडला, ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

यात सभेनंतर राहुल गांधी टॉयलेटला गेले. टॉयलटेवर गुजरातीमध्ये जेंट्स आणि लेडीज असे दोन बोर्ड होते. मात्र गुजराती भाषा वाचता येत नसल्याने राहुल गांधी चुकून लेडीज टॉयलेटमध्ये घुसले. त्यानंतर या प्रकाराची एकच चर्चा सुरु झाली. राहुल गांधी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गर्दी हटवली. मात्र राहुल गांधींना लेडीज टॉयलेटमधून बाहेर पडताना पाहून सर्वांना हसू अनावर झालं.