बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (15:02 IST)

'दबंग-3' धमाकेदार व मसालेदार असेल

अकिरा, फोर्स-2, वेलकम टू न्यूयॉर्क व इत्तेफाकसारखे सातत्याने फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर आता कुठे सोनाक्षीला थोडा दिलासा मिळाला आहे. या फ्लॉप चित्रपटांनंतर सोनाक्षीने मल्टीस्टारर चित्रपटाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. हेच कारण आहे की, सोनाक्षी रेस-3 व यमला पगला दीवानासारख्या मल्टीस्टारर चित्रपटात केवळ एका गाण्यात दिसून येणार आहे. याशिवाय तिच्या पदरात धर्मा प्रोडक्शनचा मल्टीस्टारर कलंक हा चित्रपटदेखील पडला आहे. एका इव्हेंटला पोहोचलेल्या सोनाक्षीने आपला आगामी चित्रपट दबंग-3 व कलंकविषयी चर्चा केली.
 
दबंग-3 हा लवकरच शूटिंगसाठी फ्लोअरवर जाणार आहे. सोनाक्षी म्हणाली, आमचा चित्रपट दबंग-3 लवकरच शूटिंगसाठी फ्लोअरवर जाणार आहे. यावेळी प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली दबंग बनणार असून, यामध्ये मी रज्जोचीच भूमिका साकारणार आहे. दबंग सीरिजध्ये काम करताना असे वाटते की, मी माझ्या सुरुवातीच्या काळात पुन्हा परतले आहे. चित्रपटाविषयी प्रचंड उत्साहित व खूश आहे. यावेळी दबंगची कथा खूपच रोमांचक आहे. यावेळी कथेवर खूप काम करण्यात आले आहे. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल. गेल्या दोन भागांपेक्षा जास्त मसालेदार व धमाकेदार चित्रपट बनेल. यावेळी कलंकविषयी उत्साहित आहे. माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन व आदित्य रॉय-कपूरबरोबर करण जौहरच्या प्रोडक्शनखाली बनत असलेल्या कलंक या चित्रपटाध्ये सोनाक्षीदेखील मुख्य भूकिेत दिसून येणार आहे. चित्रपटाची स्टारकास्ट खूपच शानदार आहे.