सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: बुधवार, 2 मे 2018 (15:53 IST)

'इन्फिनिटी वॉर' बघतांना मृत्यू

Seeing Infinity War

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ या हॉलिवूडपट बघत असतानाच एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशमधील कडापा जिल्ह्यात घडली आहे. या माणसाचा मृतदेह प्रोडातूर शहरातील सिनेहब या सिनेमागृहात आढळला आहे.

पेडापासुपुला बाशा हे सिनेहब मल्टिप्लेक्समध्ये ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’हा थ्रीडी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट संपला तरी बाशा हे जागेवरून उठत नव्हते. सुरुवातीला मल्टिप्लेक्समधील कर्मचाऱ्यांना ते झोपले आहेत असे वाटले. त्यामुळे त्यांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला मात्र बाशा काहीच हालचाल करत नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या डोळ्यावरील थ्रीडीचा गॉगल काढला. त्यावेळी बाशा यांचे डोळे सताड उघडे होते. त्यावरून कर्मचाऱ्यांना बाशा यांचा मृत्यू झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी बाशा यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.