बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

काउंटरॅटॅक, अरहान म्हणाला रोडछाप असल्यासारखे माझ्यावर ओरडली अनुष्का

टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहली याने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याची बायको अनुष्का शर्मा एक कारमध्ये बसलेल्या एका माणसावर नाराज होताना दिसत आहे. आता या मुंबई रहिवाश्याने सोशल मीडियावर काउंटरॅटॅक केला आहे.
 
त्याने रस्त्यावर कचरा फेकला म्हणून अनुष्का चिडली आणि ट्रॅफिक सिग्नलवर कार थांबली तेव्हा त्या व्यक्तीची क्लास घेतली आणि त्याला असे करु नये सांगितले.
 
यावर आता मुंबईच्या या व्यक्तीने सोशल मीडियावर काउंटरॅटॅक केला आहे. अरहान सिंह नावाच्या या व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले- चुकीने माझ्याकडून प्लास्टिकची बाटली रस्त्यावर पडली आणि नंतर अनुष्काने एखाद्या रोडछाप असल्यासारखे माझ्यावर ओरडणे सुरू केले.
 
मी तिची माफी मागितली तरी तिने ऐकले नाही. माझ्या कारमधून रस्त्यावर पडलेल्या कचर्‍यापेक्षा अधिक कचरा तर अनुष्काच्या तोंडातून बाहेर पडत होता. मी हैराण आहे, वैयक्तिक फायद्यासाठी विराट कोहलीने हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला.
 
मोदींच्या मंत्र्याने केले कौतुक: कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अनुष्काचे कौतुक करत ट्विट केले की स्वच्छ भारता प्रती ज्याप्रकारे अनुष्का शर्मा सजग आहे ते कौतुकास्पद आहे.