बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जुलै 2018 (11:27 IST)

ऐश्वर्या बनणार 'इंडियन मॅडोना'

'ऐ दिल है मुश्कील'नंतर ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा ग्लॅरस भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आगामी 'फन्ने खाँ' या चित्रपटात ती एका गाण्यासाठी 'मॅडोना'ही बनली आहे. या 'म्युझिकल-ड्रामा' चित्रपटात तिच्यासमवेत अनिल कपूर आणि राजकुमार राव असून, हा चित्रपट 3 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फ्रँक गॅटसन ज्युनिअर याने केली आहे. त्याने जेनिफर लोपेज, बेयॉन्स आणि रिहानासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कलाकारांसमवेत काम केले आहे. ऐश्वर्यावर चित्रीत होणारे हे गाणे सुनिधी चौहानने गायिले असून, त्यामधून ऐश्वर्याला 'भारतीय मॅडोना' अशा रूपातच सादर केले जाणार आहे. मॅडोना या पॉप गायिकेने अनेक दशके पाश्चात्त्य जगतात आपला दबदबा ठेवला होता. आता तिची झलक ऐश्वर्याच्या या गाण्यातून दिसून येईल. एक गायिका आणि नर्तकी अशा रूपात तरुणाईला थिरकण्यास भाग पाडणारी नायिका ऐश्वर्याने यामध्ये साकारली आहे. जगातील अत्यंत नावाजलेल्या नृत्यदिग्दर्शकांपैकी एक असलेल्या फ्रँकची कोरिओग्राफी असल्याने ऐश्वर्यासाठी हे गाणे विशेष ठरणार आहे. बेल्जियमच्या 'एव्हरीबडीज फेमस' या चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिेमेक आहे. भूषण कुमार आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.