मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'संजू’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपट हा प्रदर्शनापूर्वीच लीक झाला आहे. देशभरातील चित्रपटगृहात शुक्रवारी २९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
 
या चित्रपटाची टोरेंट डाऊनलोड लिंक काही युजर्सनं शेअर केली आहे. तर या चित्रपटाची एचडी प्रिंटदेखील उपलब्ध असल्याचा दावा काही युजर्सनं केला आहे. यामुळे सोशल मीडियावर रणबीरच्या चाहत्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. युजर्सनं लिंक शेअर करून पायरसीचा प्रसार करू नये असं आवाहन चाहत्यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभेल आणि पहिल्याच दिवशी हा चित्रपट ३० कोटींहून अधिकचा गल्ला जमवेल असा विश्वास अनेक चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट लीक झाल्यानं याचा फटका चित्रपटाच्या कमाईला बसणार आहे.