मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मे 2018 (12:36 IST)

मुन्नाभाई येत आहे लवकरच परत

नुकताच संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘संजू’या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या ‘संजू’या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये राजकुमार हिरानी व्यस्त असले तरीही त्यांनी संजय दत्तच्या चाहत्यांना एक खूषखबर दिली आहे. संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई’चा लवकरच सिक्वेल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
 
लवकरच चाहत्यांच्या भेटीला मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून त्याचा सिक्वेल बनवण्याची इच्छा राजकुमार हिरानी यांनी बोलून दाखवली आहे. राजकुमार हिरानी यांनी चाहत्यांना ही खूषखबर आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. मुन्नाभाईच्या तिसर्‍या सिरीजवर लवकरच काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
‘मुन्नाभाई’च्या कथेवर गेले अनेक दिवस काम सुरू असून मात्र हा चित्रपट पहिल्या दोन भागांच्या तुलनेत कहाणी नसल्याने मागे पडला होता. पण आता यात एक खास आयडिया आणि कहाणी आहे. आम्ही ज्याद्वारे लवकरच नवा चित्रपटा करू शकतो, असेही राजकुमार हिरानी म्हणाले.