सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकत्र काम करणार

बॉलिवूडमध्ये गाजलेले संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी पुन्हा एकदा एकत्र  येत आहेत. 
करण जोहरने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. त्यामुळे 
लवकरच त्याच्या चित्रपटात मुन्नाभाई आणि मोहिनीला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. अभिषेक वर्मन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
 

सुरुवातीला या चित्रपटासाठी श्रीदेवीची निवड करण्यात आली होती, पण तिच्या अचानक जाण्याने मुख्य भूमिकेसाठी पुन्हा शोधाशोध सुरु झाली होती. अखेर माधुरीची निवड करण्यात आली. जान्हवी कपूरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माधुरीचे आभार मानले होते. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. सुरुवातील या चित्रपटाचं नाव ‘शिद्दत’ असल्याचं वृत्त होतं. पण नंतर करण जोहरने ट्विट करत नाव अद्याप ठरलं नसल्याचं स्पष्ट केल आहे.