गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (15:08 IST)

६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

चित्रपट विभागातील सन्मानाच्या अशा ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा डंका वाजताना दिसत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
 
यशराज कऱ्हाडे दिग्दर्शित म्होरक्या या चित्रपटाला विशेष पुरस्कार मिळाला आहे. तर, मृत्युभोग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे या दिग्दर्शकाचा मयत हा लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या लघुपटासाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. तर मॉम या चित्रपटातील अभिनयासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
पुरस्कारावर उमटलेला मराठी ठसा-
 
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – ठप्पा – निपुण धर्माधिकारी
 
इतर पुरस्कार-
 
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – बाहुबली २
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली २
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (टॉयलेट एक प्रेम कथा)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण – वॉटर बेबी – पिया शाह
सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग
सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती – गिरीजादेवी माहितीपट
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान- मॉम
सर्वोत्कृष्ट गाणं – ए.आर. रहमान