गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (09:48 IST)

“भैय्याजी सुपरहिट’मध्ये सनी देओलचा डबल रोल

sunney deol
सनी देओलच्या ऍक्‍शनपटांची त्याच्या चाहत्यांना नेहमीच अपेक्षा असते. आता तर त्याच्या आगामी सिनेमामध्ये सनी पहिल्यांदाच डबल रोल साकारणार आहे. “भैय्याजी सुपरहिट’असे या सिनेमाचे नाव असून त्यामध्ये सनी बरोबर प्रिती झिंटा, अमिषा पटेल, श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी आदी कलाकार असणार आहेत. ही एक धमाल कॉमेडी असणार असून याच वर्षी 14 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज्‌ होणार आहे.
 
यातील डबल रोलमधील एका रोलमध्ये सनी देओल उत्तर प्रदेशातील एका गॅंगस्टरच्या रूपात दिसणार आहे. या डबल रोलमधील नेहमीची धमाल तर असणार आहेच. याशिवाय अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदेचा कॉमेडी तडकाही असणार आहे. आपल्या 35 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सनी दोल पहिल्यांदाच करतो आहे. यातील एका जोडीमध्ये प्रिती झिंटा सनीची हिरोईन असणार आहे. प्रितीने सनीबरोबर यापूर्वीही काही सिनेमांमध्ये काम केले होते. बऱ्याच दिवसांनी अमिषा पटेलही पडद्यावर दिसणार आहे. आतापर्यंत अश्रु ढाळण्याचे रोल तिने गाजवले होते. आता सनीच्या या डबल कॉमेडीमध्ये ती हसवण्यासाठी येते आहे.