सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत

Racha chadda
अभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या चर्चा करत आहे. इनसाईड एजची कथा क्रिकेट व याखेळातील छुप्या पैलूंवर आधारित आहे, ज्याच्या अवतीभोवती व्यापार, ग्लॅमर, मनोरंजन व राजकीय दुनियादेखील सामील आहे. ही भारतातील पहिली मेझॉन ओरिजनल वेब सीरिज होती. रिचाने एका ट्विटर युझरच्या पोस्टला दिलेल्या उत्तरामध्ये दुसर्‍या सीझनविषयी खुलासा केला. ट्विटर युझरने लिहिले होते, पुन्हा इनसाईड एज पाहात आहे व झरीनाला पाहून माझी गमावलेली ताकद मला पुन्हा मिळाली आहे व अनेक अडसर असतानाही आपण एक विजेता ठरू शकतो हे मला कळून चुकले आहे. ही भूमिका इतक्या शानदार पद्धतीने साकारल्याबद्दल आभार, रिचा चढ्ढा. तू झरीनची व्यक्तिरेखा खास बनविली. त्यावर रिचाने लिहिले की, ओह मॅन, इनसाईड एज सीझन-2 वरील चर्चेसाठी आताच भेट घेतली. मी याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत.