1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (14:38 IST)

राधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'

radhika madah
छोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. हे नाव कुठले तर राधिका मदान हिचे. राधिका मदान हिला आपण 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेत पाहिले असेलच. या मालिकेने राधिका घराघरात पोहोचली. आता राधिकाने बॉलिवूडची तयारी चालवली आहे. ज्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात संधी मिळावी म्हणून बडे बडे स्टार प्रतीक्षा करतात, अशा दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी राधिकाला मिळाली आहे. होय, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटातून राधिका बॉलिवूड डेब्यू करतेय. विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'छुरियां' या कॉमेडी चित्रपटात राधिका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
 
राधिकाचा बॉलिवूडशी कुठलाही संबंध नाही. म्हणजेच, तिने अतिशय संघर्षाने स्वबळावर अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 'छुरियां' हा चित्रपटही राधिकाला याच मेहनतीच्या जोरावर मिळाला. या चित्रपटासाठी 60 मुलींचे ऑडिशन घेतले गेले होते. यातून राधिकाची निवड झाली. आपल्या प्रतिभेच्या जोरावर राधिकाने ही भूमिका आपल्या खिशात टाकली. विशाल भारद्वाज हे सुद्धा राधिकाची प्रतिभा पाहून चांगलेच प्रभावित झालेत. आम्हाला या भूमिकेसाठी जशी अभिनेत्री हवी होती, राधिका एकदम तशीच आहे. या भूमिकेच्या चौकटीत ती अगदी फिट बसते, असे ते म्हणाले.