1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (12:40 IST)

सोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं

sonam kapoor
अभिनेत्री सोनम कपूर लवकरच बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडणारआहे. ११ आणि १२ मे असा दोन दिवस हा सोहळा असणार आहे. सोनम कपूरचे कुटुंबिय आणि इंडस्ट्रीमधील जवळचे मित्र लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. एक आठवडा लग्नाचं सेलिब्रेशन चालणार आहे. लग्नाआधी सोनम कपूर आणि आनंद अहुजाचा साखरपुडाही पार पडणार आहे. 
 

सोनम गेल्या 4 वर्षांपासून बिझनेसमन आनंद आहुजाला डेट करते आहे. दोघांना अनेक वेळा परदेशात पार्टीत करताना आणि एकत्र फिरताना पाहण्यात आले आहे.  सोनम अनेकवेळा आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे अनेकदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे