गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (16:52 IST)

रेमोच्या चित्रपटाविषयी उत्साहित आहे कॅटरिना

katrina kaif varun dhavan
अभिनेत्री कॅटरिना कैफ पहिल्यांदा वरुण धवनबरोबर रोमे डिसूझाच्या आगामी चित्रपटामध्ये काम करणार आहे व त्याविषयी ती खूप उत्साहित आहे. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये बोलताना कॅटरिना म्हणाली की, वरुण अतिशय ऊर्जावान अभिनेता आहे, ज्याच्याबरोबर काम करण्याची माझी पूर्वीपासूनच इच्छा होती आणि आता हे सर्व प्रत्यक्षात घडून येत आहे. वरुण एक चांगला अभिनेता असण्याबरोबरच एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे व आपली ही प्रतिभा त्याने आतापर्यंत आपल्या अनेक चित्रपटांतून सिद्ध केली आहे. त्यामुळे रेमोबरोबर चित्रपटात काम करणे खूप मजेदार ठरेल. निश्चितच मी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे व मी रमोला त्याकरिता धन्यवाद देऊ इच्छिते, ज्याने मला यामध्ये काम करण्याची संधी दिली.