शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (11:23 IST)

आमिर खान साकारणार ओशो

Aamir Khan
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने वर्षातून केवळ एकच सिनेमा करण्याचे ठरवले आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा हा एकच सिनेमा इतरांच्या वर्षातल्या 3-4 सिनेमांचा रेकॉर्ड तोडण्यास पुरेसा होतो. आमिरने त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या महाभारतची तयारी सुरू केली आहे आणि आमिर गुलशन कुमारच्या बायोपिकमध्येही काम करणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी समजले होते. मात्र या निव्वळ अफवा ठरत आहेत. कारण आमिर ओशोच्या जीवनावरील सिनेमामध्ये ओशोंच्याच रुपात दिसणार आहे. त्याच्याबरोबर आलिया भटदेखील या सिनेमात दिसणार आहे. ओशोवरच्या या सिनेमाचे शूटिंग याच वर्षी सुरु होणार आहे. शकुन बत्रा यांच्या या सिनेमाला आमिरने ग्रीन सिग्नल दिला आहे, असेही समजले आहे. मात्र या बातमीला अद्याप अधिकृतपणे कोणी घोषित केले गेलेले नाही. आमिर स्वतःहून आपल्या सिनेमाबद्दल कोणतीही घोषणा करत नाही. त्यामुळे जोपर्यंत याची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत हे नुसते गॉसिप आहे, असे म्हणावे लागेल. ठग्ज ऑफ हिंदुस्थाननंतर आणि कोणत्या सिनेमाला होकार देतो, त्यावरच या प्रश्नाचे खरे उत्तर समजू शकेल. पण ओशोंवर एक बायोपिक येऊ शकतो आहे, एवढी माहिती तरी आता मिळाली.