1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. Hindi series based on Pulan's literature soon

पुलंच्या साहित्यावर आधारित हिंदी मालिका लवकरच

Hindi series
पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व यांची भुरळ हिंदी मनोरंजन विश्वालाही सुद्धा पडली आहे. त्यामुळे आता पुलंच्या साहित्यावर आधारित हिंदी मालिका लवकरच टीव्हीवर येणार आहे. पुलांची ही भूमिका साकारत आहेत अभिनेते संजय मोने. अवघ्या महाराष्ट्राचं पु. लं देशपांडे हे लाडकं व्यक्तिमत्व आहे. पुल देशपांडे यांच्या प्रतिभेतून उतरलेल्या सखाराम गटणे, नामू परीट, अंतू बर्वा यासारख्या व्यक्तिरेखांवर महाराष्ट्राने खूप प्रेम केले आहे. पुलंच्या  प्रतिभेचं आकर्षण आता हिंदी टेलिविश्वालाही होत असल्याचं दिसत आहे. ही नवीन मालिका सोनी सब या 'व्यक्ती आणि वल्ली'वर आधारित 'नमुने' ही हिंदी मालिका लवकरच सुरु होणार आहे. अभिनेते संजय मोनेंसह सुबोध भावेसारख्या अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज मालिकेत दिसणार आहे. साडे माडे तीन, संशयकल्लोळ, म्हैस यासारखे चित्रपट, आभाळमाया, माझिया प्रियाला प्रीत कळेना यासारख्या मालिका, कुसुम मनोहर लेले, हम तो तेरे आशिक है सारख्या नाटकांमध्ये संजय मोनेंनी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे  आता मराठीत कसे सर्वाना खूप आनंद दिला आता पुलं यांचे साहित्य आता हिंदीत आनंद देणार आहे.
पुढील लेख
हायकोर्टाने चिकनवरून झापले सरकारला, वजन वाढवण्यासाठी बाजारात इंजेक्शनचा वापर