बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (12:43 IST)

फक्त 65 सेकंदात 'जीरो' ते हीरो बनेल शाहरुख खान, हा टीजर मोडू शकतो बरेच रेकॉर्ड

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचे बहुचर्चित चित्रपट 'जीरो'चा त्याच्या चाहत्यांना आतुरतेने वाट आहे. कारण जेव्हा जानेवारीमध्ये 'जीरो'चा पहिला टीजर रिलीज झाला होता तेव्हा काही मिनिटातच तो सोशल मीडियावर वायरल झाला होता. यानंतर चित्रपटाची सर्वांनाच वाट आहे.
 
अशात एक वृत्त अजून आले आहे की चित्रपट 'जीरो'चे एक टीजर लवकरच रिलीज होणार आहे. मीडियाने दिेलेल्या वृत्तानुसार हे टीजर ईदच्या दिवशी रिलीज करण्यात येणार आहे. सांगण्यात येत आहे की या अपकमिंग टीजर मध्ये शाहरुख खानचा साथ देण्यासाठी सलमान खान येत आहे. 'जीरो'च्या टीजरला सलमान खानचे चित्रपट 'रेस 3' सोबत दाखवण्यात येणार आहे.
त्याशिवाय टीजरशी निगडित एक अजून खुलासा झाला आहे. इंग्रजी वेबसाइट डीएनएच्या वृत्तानुसार  'जीरो'चा पुढील टीजर 65 सेकंदाचा होऊ शकतो. जेव्हापासून शाहरुख खानच्या चाहत्यांना हे माहीत झाले आहे की 'जीरो'चा ट्रेलर येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे, तेव्हापासून त्यांच्यात टीजरला बघण्याची  एक्साइटमेंट वाढली आहे.
 
फिल्म 'जीरो'चे निर्देशन आनंद एल राय करत आहे. चित्रपटात शाहरुखशिवाय आर माधवनची मुख्य भूमिका आहे. चित्रपटात शाहरुख एका बोने ची भूमिका साकारणार आहे. 'जीरो' 21 डिसेंबर रोजी रिलीज होऊ शकते.