रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (16:10 IST)

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कर्करोग

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कर्करोगाने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. सोनालीने स्वत: सोशल मीडियावरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे. हम साथ साथ है, सरफरोश अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोनाली बेंद्रेला कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले आहे. ती सध्या न्यू यॉर्क येथे उपचार घेत आहे. तिने या आजाराविषयी व तिच्या अनुभवांविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
 
‘कधीकधी, आयुष्य अनपेक्षित वळण घेते. मला हायग्रेड कर्करोगने ग्रासले आहे. एका छोट्या दुखण्यामुळे काही चाचण्या केल्या आणि त्याचे निदान हे असे अनपेक्षित आजारात झाले. निदान झाल्यानंतर माझे मित्रमंडळी, कुटुंबीय मला आधार देण्यासाठी आले आहेत. मी त्या सर्वांची आभारी आहे.  यावर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे याशिवाय पर्याय नाही. माझ्यावर सध्या न्यू यॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. मी नेहमीच सकारात्मक विचार करते. त्यामुळे मी या कॅन्सरशी लढा देणारच. गेल्या काही दिवसात मला जे प्रेम आणि आधार मिळाला त्याने लढण्यासाठी बळ दिलं आहे. मी त्यासाठी सर्वांची आभारी आहे’, असे सोनालीने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.