शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 4 जुलै 2018 (11:52 IST)

हृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही 'डर'!!

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची नावे लेखकांच्या यादीत सामील आहेत. अभिनय ते लेखन असा प्रवास करणार्‍यांमध्ये ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान अशी एक ना अनेक नावे घेता येतील. आता यात आणखी एक नाव सामील होणार आहे. ते म्हणजे हृतिक रोशन. होय, हृतिक रोशन लवकरच स्वतःच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणार असल्याचे कळतेय. आपली कथा जगापुढे आणण्यास हृतिक सज्ज झाला आहे. निश्चितपणे हृतिकच्या चाहत्यांसाठी हीआनंदाची बातमी आहे. पण एका व्यक्तीला मात्र यामुळे धडकी भरू शकते. ती कोण तर कंगना राणावत. होय, कंगना व हृतिक यांची  'अजब प्रेम की गजब कहानी' सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा कायदेशीर वाद, त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप -प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे सगळेच काही जगजाहीर आहे. हृतिक आपल्या आयुष्याचा खुलासा करणार म्हटल्यावर हे सगळे पुन्हा एकदा बाहेर येणार, अशी धास्ती कंगनाला वाटू शकते. पण कंगनाला धास्ती वाटण्याचे काहीच कारण नाही. होय, कारण हृतिकच्या निकटस्थ सूत्रांचे मानाल तर, कंगनाशिवायही हृतिकजवळ जगाला सांगण्यासारखे खूप काही आहे. त्याचे अख्खे आयुष्य प्रेरणादायी राहिले आहे आणि खरे तर त्यात तथ्यही आहे. हृतिक लहानपणापासून अडखळत बोलायचा.