1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

टेन्शन घ्यायचंच नाही...

whats app message
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो...
 आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...
 
कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... आपण त्याच्या विषयी तसेच इतरां विषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे... बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा...
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...
 
 
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."  
     
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात. 
नेहमी हसत रहा