मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अक्षयच्या गोल्डचे नवीन गाणे रिलीज

new song of gold
अक्षय आता वेगळ्या धाटणीतील चित्रपट देतो आहे.असे चित्रपट की त्यांना आशय आहे. त्याचा आगामी चित्रपट 'गोल्‍ड'चा ट्रेलर रिलीज झाल्‍यानंतर या चित्रपटातील नवे गाणे लॉन्‍च झाले आहे. छोट्‍या पडद्‍यावरील अभिनेत्री मौनी रॉय व अक्षय कुमार यांचा अंदाज 'नैनो ने बांधी' या गाण्‍यात दिसला. हे गाणे यू्-टयूबवर रिलीज झाल्‍यानंतर काही तासातच गाण्‍याच्‍या व्‍हिडिओला ३ लाखांहून अधिकवेळा पाहण्‍यात आले आहे. या चित्रपटात हॉकी प्रशिक्षक तपन दास  यांची अक्षय कुमारने यांची भूमिका साकारली आहे. स्वातंत्र्य दिनाच्‍या औचित्‍याने हा चित्रपट रिलीज होणार असून चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्‍यानंतर तुम्‍हाला अभिमान वाटणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्‍या पसंतीसही उतरला आहे. पोस्‍टरमध्‍ये अक्षय कुमारने कोट घातलेला होता. तपन दास यांनी ऑलिम्‍पिक खेळात पहिल्‍यांदा भारतीय हॉकी टीमसाठी सुवर्णपदक जिंकण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले होते. या चित्रपटाचे वर्णन असे की 'वो सपना जो देश को एक करने के लिए देखा, वो सपना जो १९३६ में में देखा गया, वो सपना जिसे पूरे होने में १२ साल लग गए।'  असे करता येणार आहे.