गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (16:48 IST)

सोनालीने आरोग्‍याकडे लक्ष दिले नाही, रिपोर्टमध्‍ये झाला खुलासा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्‍या न्‍यू-यॉर्कमध्‍ये कॅन्‍सरवर उपचार घेत आहे. आता सोनाली बेंद्रेच्‍या मेडिकल रिपोर्टमध्‍ये आणखी एक नवा खुलासा झाला आहे. यात सोनालीने आपल्‍या तब्‍येतीकडे लक्ष न दिल्‍याने तिला कॅन्‍सर झाल्‍याने मेडिकल रिपोर्टमध्‍ये खुलासा झाला आहे. 
 
डॉक्टर्सचे म्‍हणणे आहे की, सोनालीने आरोग्‍याकडे लक्ष न दिल्‍याने कॅन्‍सर पुढच्‍या स्‍टेजवर पोहोचला. सोनाली बेंद्रेने खूप उशीरा संपूर्ण शरीर दुखत असल्‍याचे डॉक्‍टरांना सांगितले. तिने दुखण्‍याकडे लक्ष न दिले नाही. मेडिकल टेस्‍ट केल्‍यानंतर तिला कॅन्‍सर झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. सोनालीला हाय ग्रेड कॅन्‍सर आहे तिचा कॅन्‍सर शेवटच्‍या स्‍टेजला आहे. असे असले तरीही ही तिचा जीव वाचू शकतो असे तिने म्‍हटले आहे.