बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनीच्या बायोपिकचा टिझर रिलीज

करणजित कौर ऊर्फ सनी लिऑनी हिची वेगळी ओळख करून देण्याची आता गरज नाही. अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये दाखल झालेली सनी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेली सेलिब्रेटीदेखील बनली, तर कधी तिचे शोज वादाच्या भोवर्‍यातही अडकले. आता सनी आपलीच बायोपिक घेऊन येत आहे. ही एक वेब सीरिज असून, तिचे नाव करणजित कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिऑनी आहे. यामध्ये सनी स्वतःचीच व्यक्तिरेखा साकारत आहे. आता या वेब सीरिजचा टिझर समोर आला आहे. जवळपास 40 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सनी लिऑनीचे दोन वेगळे पैलू पाहायला मिळत आहेत. या वेब सीरिजची खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. सनी लियॉनीदेखील वेळोवेळी त्याच्या सेटवरून आपले फोटो शेअर करत होती. आता तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याचा टिझर शेअर केला आहे. या टिझरबरोबर तिने लिहिले आहे, माझे आयुष्य लवकरच एक खुले पुस्तक असेल.