1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (10:09 IST)

हार्दिक पांड्याला झाला ट्रोल

leave modelling
भारतीय संघाच्या इंग्लंड कसोटी मालिकेतील कामगिरीवरचा  राग व्यक्त करण्याची एकही संधी नेटिझन्स सोडत नाहीत. इंग्लंड मालिकेतील ४-१ असा पराभव झाला आहे. त्यानंतर भारतीय खेळाडूही सोशल मीडियावर चाहत्यांना आपली बाजू पटवून देत असल्याचे चित्र आहे. पण, त्यावरही चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागत आहे. असाच हार्दिक पांड्याला अनुभव  आला. चाहत्यांनी तर त्याला क्रिकेट सोड मॉडेलिंग कर असा खोचक सल्लाही दिला.आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी पांड्याने इंस्टाग्रामवर इंग्लंड मालिकेतील कामगिरीबद्दल दुखी असल्याचा मॅसेज पोस्ट केला. पण त्यासोबत त्याने एक कुल फोटोही पोस्ट केल्याने तो ट्रोल झाला.