मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:18 IST)

भारताने टेस्ट सीरिज ३-१ ने गमावली

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. याचबरोबर भारतानं ५ टेस्ट मॅचची सीरिज ३-१नं गमावली आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन करत मॅच २०९ रननं जिंकली होती. पण आता चौथ्या टेस्टमध्ये पुन्हा भारतानं निराशा केली. मोईन अलीच्या फिरकीसमोर भारतीय बॅट्समननी नांगी टाकली. त्यानं इंग्लंजकडून सर्वाधिक चार बळी घेतले. भारताचा दुसरा डाव १८४ रनवरच आटोपला. आणि भारतीय टीमला ६० रननी पराभव सहन करावा लागला.
 
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाला विजय साकारुन देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. विराट कोहलीनं ५८ धावा आणि अजिंक्य रहाणेनं ५१ धावांची खेळी केली. विराट आणि अजिंक्यचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. आता ७ सप्टेंबरपासून पाचव्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.