शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:11 IST)

साई चरणी चांदीचे सिंहासन, साई प्रतिमेची चांदीची फ्रेम अर्पण

शिर्डीतल्या साईबाबांच्या शरणी नोएडा येथील एका साईभक्ताने तब्बल 21 कि. 502 ग्रॅम वजनाचे चांदीचे सिंहासन व साई प्रतिमेची चांदीची फ्रेम अर्पण केली आहे. देणगीदार साईभक्‍त प्रशांत श्रीवास्तव यांनी 7 लाख 74 हजार 72 रुपये किंमतीच्या 21 किलो 502 ग्रॅम वजनाच्या चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट संस्थानला देणगी दिली. ते शिर्डीत रविवारी सकाळच्या सुमारास साई दर्शनासाठी आले होते. या प्रसंगी वरील दान दिले. 
 
या वस्तूंची संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विधीवत पूजा केली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्या फोटोकरीता करण्यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातून दर गुरुवारी निघणार्‍या पालखीतील पादुका व सटका ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.