मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (15:42 IST)

इंडियन क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री -‘एअरलिफ्ट’ची अभिनेत्री निमरत कौर यांचे अफेंर

क्रिकेट व बॉलिवूड यांच्यात एक वेगळचे सबंध आहेत. याच आकर्षण व सबंधावर स्टार्स क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या नात्यांची एक वेगळीच आणि आकर्षित करणारी फार जुनी परंपरा सुरू आहे.
 
यामध्ये अनेक स्टार क्रिकेटर्सचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडले गेलय. तर दुसरीकडे अनेक अफेअर्स फक्त चवीने चघळण्यापुरतेच मर्यादीत आहेत. काहींची क्रिकेटर यांची अफेअर्स लग्नापर्यंत पोहोचली आहे. सध्या अशाच एका क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शनची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे इंडियन क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री, ‘एअरलिफ्ट’ची अभिनेत्री निमरत कौर यांच्यात वेगळीच खिचडी शिजत असल्याचे समोर आले आहे.
 
मागील दोन वर्षांपासून रवी शास्त्री आणि निमरत कौर कथितरित्या एकमेकांना डेट करत आहेत. दोन वर्षांत दोघांनीही याची कोणाला खबर लागू दिले नाही. मात्र आता ही बातमी उघड झाली आहे.
 
आत्तापर्यंत दोघेही सार्वजनिक जीवनात फारसे एकत्र दिसले नाहीत. अर्थात २०१५ पासून अनेकदा ही जोडी एका जर्मन कारच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली. येथूनचं दोघांची लव्हस्टोरी लॉन्च झाली आहे. रवी शास्त्री पत्नीपासून विभक्त झाले आहेत. त्यामुळे आता रवी-निमरात नाव लवकरच जोरदार चर्चेत होणार आहे.