शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (08:46 IST)

बिग बॉस मराठी : अभिनेत्री मेघा धाडे विजेती

अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची पहिली विजेती ठरली आहे. लोणावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत मेघाने पुष्कर जोगवर मात केली. जवळपास गेल्या शंभर दिवसांपासून चाललेला हा प्रवास अखेर संपला आणि या प्रवासात सर्वात जास्त ज्या व्यक्तीची चर्चा झाली, तीच व्यक्ती विजेती म्हणून सर्वांसमोर आली. १८ लाख ६० हजार रुपये तिला बक्षिसाची रक्कम म्हणून मिळाली आहे.
 
१५ एप्रिल रोजी बिग बॉस मराठीचा खेळ सुरू झाला. ज्यामध्ये जवळपास १२ सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. दररोज नवीन वाद, नवीन टास्क, टास्कदरम्यान सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली कुरघोडी यांसारख्या अनेक गोष्टींमुळे हा शो कायम चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावर जवळपास आठवड्याभरापासून जोरदार चर्चा रंगली.