1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (16:12 IST)

संजय जाधवला मिळाले वाढदिवसाचे वेगळे गिफ्ट

sanjay jadhav
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व अभिनेता संजय जाधवला यंदा वाढदिवसादिवशी आगळे गिफ्ट मिळाले आहे. संजय जाधवच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेणारी http://imsanjayjadhav.com ही वेबसाइट भेट म्हणून दिली आहे. संजय जाधवच्या टिमने ही वेबसाइट त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. याविषयी संजय जाधवच्या 'दुनियादारी', 'तूहिरे', 'प्यारवाली लव्हस्टोरी' आणि 'गुरू' या चित्रपटाचे निर्माते आणि बिझनेस पार्टनर दिपक राणे म्हणाले की, 'दादांचा (संजय जाधव) वाढदिवस हा आमच्या पूर्ण टिमसाठी खूप मोठा सण असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास आम्हाला करायचे होते. म्हणूनच यंदा टिमने त्यांना ही वेबसाइट भेट दिली आहे. आम्हाला आशा आहे की, त्यांच्या चाहत्यांनाही ही वेबसाइट खूप आवडेल.'
 
तर याबाबत संजय जाधवने सांगितले की, 'ही वेबसाइट माझ्यासाठी सरप्राईज होते. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी उठल्यावर हा सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. सध्या आनंद व्यक्त करायला मला शब्द अपूरे पडत आहेत.'