शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (09:31 IST)

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम सहा दरवाजे उघडले

राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात कोयना धरण सातारा येथे असून मोठय़ा प्रमाणात या भागात पाऊस कोसळत असून आहे. पावसाने जूनचा पूर्ण  अनुशेष जुलैमध्ये भरून काढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. २४ तासात तब्बल ७ टीएमसी पाण्याची वाढ झाली तर पाटण, कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले आहे. या धरणातून ५००० क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले. तसेच पायथा वीज गृहातुन २१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा वेग पाहता सध्या ७१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जात आहे. कोयना धरणामध्ये ७८ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माण, खटाव व फलटण तालुके वगळता सर्वत्र पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.