सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जुलै 2018 (09:03 IST)

स्वराज यांनी ट्रोलरची 'अशी' केली बोलती बंद

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण स्वराज यांनी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. त्यामुळे त्या व्यक्तीची  बोलतीच बंद झाली.
 
‘व्हिसामाता’नावाच्या एका ट्विटर हॅंडलवरुन, ”मॅडम तुम्ही व्हिसामातावरुन सिटिझनशिप माता केव्हा बनणार ? म्हणजे मला म्हणायचंय की, पाकिस्तानातून आलेले हिंदू आणि शिख शरणार्थींना नागरिकत्व द्यायला केव्हा सुरू करणार”,असं ट्विट करण्यात आलं. त्या व्यक्तीला सुषमा स्वराज यांनी त्याच्याच भाषेत उत्तर देताना, ”प्रिय पुत्र, नागरिकत्वाचे निर्णय हे गृह मंत्रालय घेत असतं, परराष्ट्र मंत्रालयाचं ते काम नाही”,असं ट्विट केलं. यासोबतंच स्वराज यांनी त्या व्यक्तीला आशीर्वाद देताना ट्विटच्या अखेरीस ‘आयुष्मान भव’असं म्हटलं. स्वराज यांच्याकडून आलेल्या या भन्नाट उत्तरानंतर ट्रोल करणाऱ्या त्या व्यक्तीने ते ट्विट डिलिट केलं.