शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 11 जुलै 2018 (11:55 IST)

ट्विटरवर फॉलोअरमध्ये सुषमा स्वराज यांची आघाडी

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर कमाल केली आहे. त्या जगातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या महिला नेता ठरल्या आहेत. संपूर्ण क्रमवारीचा विचार करता स्वराज यांचा सातवा क्रमांक लागतो. याशिवाय सुषमा स्वराज या जगभरातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या परराष्ट्र मंत्रीही ठरल्या आहेत. कम्यूनिकेशन एजन्सी बीसीडब्ल्यूच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जगभरातील नेत्यांच्या तुलनेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याबबातीत तिसऱ्या स्थानावर असून व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 
 
या अहवालानुसार राष्ट्रपतीपदाचा पदभार सांभाळल्यापासून ट्विटरवर ट्रम्प यांच्या फॉलोअर्समध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सध्या ट्रम्प यांचे ट्विटरवर 53 मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत. पोप फ्रान्सिस यांचा याबाबतीत दुसरा क्रमांक लागतो, त्यांचे ट्विटरवर सध्या 47 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवरील लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 42 मिलियन फॉलोअर्स आहेत.