शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जुलै 2018 (09:04 IST)

विवाह नोंदणी ऑनलाईन करण्याचे बंधनकारक

नोंदणी व मुद्रांक विभागाने विवाह नोंदणी ऑनलाईन करण्याचे बंधनकारक केले आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक, कोकण विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार आता १ ऑगस्टपासून विवाहाची नोटीस केवळ ऑनलाईनच स्वीकारण्यात येणार आहे. पहिली म्हणजे नोटीस देण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०१७ पासून ऑनलाईन पूर्ण करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याची लिंक देखील www.igrmaharashtra.gov.in देण्यात आली आहे. मात्र आता ही प्रक्रिया केवळ ऑनलाईनच करणे आता नव्या निर्णयानुसार बंधनकारक राहील. त्यामुळे अनेकांचे कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत. तरकागद पूर्ण असून सुद्धा अनेकदा त्रास सहन करावा लागत होता. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. या विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रिया देखील संगणकीकृत केली आहे. त्यामुळे आता विवाहाची तारीख घेवून लग्न करणे असे सोप्पे झाले आहे.