शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (09:01 IST)

'म्हणून' पत्नीला बेदम मारहाण करत तीन तलाक दिला

talak
उत्तरप्रदेशमध्ये एका नवऱ्याने करपलेली चपाती वाढली म्हणून पत्नीला बेदम मारहाण करत तिला तीन तलाक दिला आहे. त्यानंतर त्या नवऱ्याने पत्नीला घरातून हाकलून दिले आहे.राजिया असे त्या महिलेचे नाव असून तिचे मोहम्मद इक्बाल सोबत काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मोहम्मद कायम तिला छोट्या छोट्या कारणांवरून मारहाण करायचा. 
 
गेल्या आठवड्यात देखील त्याने राजियाला माराहाण करत तिच्या शरीराला जळत्या सिगारेटचे चटके दिले होते. शनिवारी राजियाच्या हातून चपात्या एक चपााती करपली होती. नेमकी अनवधानाने ती चपाती मोहम्मदला वाढली गेली. त्यामुळे संतापलेल्या मोहम्मदने राजियाला बेदम मारहाण करत तीन तलाक दिला. तसेच तिला घरातून हाकलून दिले. याप्रकरणी राजियाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप तिच्या पतीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.