बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (15:56 IST)

प्लास्टिक बंदीसाठी रेल्वेचा पुढाकार

राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टिक बंदी केल्यानंतर  एक याचाच भाग म्हणून रेल्वेनेही प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. आता स्थानकावर बॉटल क्रशर मशिन बसवल्या आहेत. शिवाय या क्रशर मशिनमध्ये बॉटल टाकणार्‍यांना रेल्वेकडून खास ऑफर म्हणून बॉटलच्या बदल्यात पाच रुपये देण्याचा विचार आहे. 
 
अनेकदा प्रवासी प्रवासा दरम्यान पाण्याच्या आणि अन्य प्लास्टिकची बाटल्या फेकून देतात. सरकारने आता प्लास्टिकवरच बंदी घातली आहे. तसेच प्लास्टिक बाटल्या अशा इतरत्र फेकल्यास दंड होण्याचीही शक्यता आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. प्रवाशांजवळ असणारी जुनी प्लास्टिकची बाटली क्रशरमध्ये टाकल्यावर प्रवाशांना पाच रुपये परतावा मिळतो.