शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:44 IST)

राज्यातील तुरुंगातून सुट्टीवर गेलेले कैदी पळाले, पेरोल की पळण्याची परवानगी

राजातल्या तुरुंग प्रशासकाचा मोठा भोंगळ कारभार उघड झाला आहे. वाहिनीच्या वृत्तानुसार राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ पॅरोलवर सोडलेले कैदी फरार अर्थात पळून गेले आहे. यात विशेष बाब म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे होते. तर अजून मोठा गोंधळ असा की यातील ४२७ फरार कैद्यांचे फोटो प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे शोधणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सर्व मिळून तीस जेल आहेत. मात्र त्यातील माहिती अद्याप उपलब्ध होऊ नकली नाही. कुख्यात कैद्यांना सांभाळणाऱ्या कारागृहाच्या या कारभाराचा ही पोलखोलच करण्यात आली आहे. फोटो नसणे हा भोंगळ कारभाराचा अक्षम्य नमुना आहे. यामुळे राज्यातील कारागृहात काय सुरू आहे हे समोर येत आहे. नेमके इतके कैदी पळतात कसे यात तुरुंग अधिकारी सामील तर नाहीत ना ? असा देखील प्रश्न विचारला जात आहे.