गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर प्रसारित झाल्यामुळे लोकांत कुठे संभ्रम, तर कुठे उत्सुकता निर्माण झाली आहे. 'थिया' नावाचा एक ग्रह पृथ्वीवर आदळला आणि मोठ्या प्रमाणात अवकाशात धूळ उडाली. ती पुन्हा एकत्र येऊन त्या उडालेल्या धुळवडीतून चंद्राचा जन्म झाला आणि तो पृथ्वीचा उपग्रह बनला.
 
चंद्रावरील खडकांच्या अभ्यासानुसार चंद्र हा पृथ्वीच्या जन्मानंतर, म्हणजे 4.5 अब्ज वर्षांदरम्यान झाला आहे. यावर आज सार्वमत झाले आहे. पृथ्वीचा जन्म थोडा आधी म्हणजे 4.6 अब्ज वर्षांपूवी झाला. सुरुवातीला 2 अब्ज वर्षांपूवी चंद्र पृथ्वीच्या आजच्या 4 लाख किमीच्या तुलनेत केवळ 2 लाख किमी अंतरावर होता. पृथ्वीवर दिवस 18 तासांचा होता, तेव्हापासून आजपर्यंत पृथ्वीची गती कमी होत आहे आणि चंद्र दरवर्षी 3.32 सेमी अंतराने पृथ्वीपासून दूर जात आहे.
 
चंद्र जेव्हा पृथ्वीच्या अगदी जवळ होता, तेव्हा त्याच्या गुरुत्व बलामुळे समुद्रात शंभर मीटर उंच एवढ्या प्रचंड मोठ्या लाटा उसळत असत. 3 अब्ज वर्षांपूवी समुद्रात सूक्ष्म जीवांचा जन्म झाला. त्यात जवळ असलेल्या चंद्राची महत्त्वाची भूमिका होती. आपल्या सूर्यालेतील अनेक ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा त्यातील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.
 
चंद्र हा पृथ्वीभोवती आणि स्वतःभोवतीसुद्धा दर 27.3 दिवसांनी एक फेरी पूर्ण करतो. म्हणूनच आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते. पौर्णिमा ते पौर्णिमा हा कालावधी मात्र 29.5 दिवसांचा असतो.
 
अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टीचंद्राशी निगडीत आहेत. अनेक वर्षे गूढ, चमत्कारिक आणि देव-देवतांचे रूप धरून असलेल्या चंद्राचे रहस्य तेव्हा उलगडले, जेव्हा रशियाचे अंतरिक्षयान चंद्रावर पोहोचले.