रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:42 IST)

पुण्यात वारीसाठी पोलीस सज्ज, मोठा फौजफाटा

जगतगुरू तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहरात आठ पोलिस उपायुक्तांसह 3 हजार 500 पोलिस आणि एक एसआरपीएफची कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या वारकरी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दोन्ही पालख्यांच्या आगमनापासून तर हडपसर मार्गे पालखी शहराबाहेर जाणार आहे. त्या ठिकाणा पर्यंत बंदोबस्त तैनात असणार आहे. 
 
शुक्रवारी जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून निघून आकुर्डी येथे मुक्कामाला थांबणार आहे. संत ज्ञानेश्‍वर महारांज पालखी, तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी शहरातून येणार आहेत. शनिवारी त्या मुक्कामी असून रविवारी शहरातून निघणार आहेत. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
यामध्ये पोलिसांनी खलील कुमक असणार आहे. 
8 पोलिस उपायुक्त, 15 सहाय्यक आयुक्त, 75 पोलिस निरीक्षक, 184 सहायक व उपनिरीक्षक, 1830 पोलिस कर्मचारी. साध्या वेशातील 1 पोलिस उपायुक्त, 2 सहायक आयुक्त, 6 पोलिस निरीक्षक, 11 सहायक व उपनिरीक्षक आणि 75 कर्मचारी तैनात असतील. 
 
वाहतूक पोलिस 
1 पोलिस उपायुक्त, 3 सहायक आयुक्त, 29 पोलिस निरीक्षक, 40 उपनिरीक्षक, 1 हजार कर्मचारी तैनात असतील. तर 150 होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात असेल. यासोबतच गुन्हे प्रतिबंधक पथके, बीडीडीएस, क्युआरटीही तैनात असेल.