बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (16:22 IST)

नागपूरचा पाऊस, पूर आला पाणी साचले आम्हाला काही म्हणायचे नाही - शिवसेना

शिवसेनेन नागपूर येथे शहरात पावसामुळे साचलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीवर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि भाजपा वर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवा जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कधी काळी नागपूरचे महापौर होते तेव्ह्या आता शहरातील पाणी साचलेला पाहून हळह्ळले असतील असे उपरोधक टीका केली आहे. येता जाता मुंबईतील पावसावर टीका करणारे आता कोठे गेले आहेत असा प्रश्न शिवसेना विचारत आहे. महिन्यापूर्वीच नागपूर शहराला देशातील ‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा ‘स्मार्ट’ शहराचे एका पावसात असे विद्रूपीकरण का झाले आणि त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील विचारला आहे. नागपूर येथे  झालाल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 
 
एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही!
 
महाराष्ट्राची उपराजधानी पाण्यात बुडाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराची दाणादाणच नव्हे तर दैना उडवली आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे संपूर्ण सरकारच नागपुरात आले आहे. तथापि, विधान भवनातच पाणी शिरल्याने  विधिमंडळाचे अधिवेशनच दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही अतोनात हाल झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार. ‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे हे शहर. आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच. नागपूरच्या विमानतळापासून विधान भवनापर्यंत आणि बाजारपेठांपासून नागरिकांच्या घरादारांपर्यंत सारे काही जलमय झाले. घराबाहेर आणि रस्त्यावर उभी असलेली वाहने तर बुडालीच, पण दुकानांतही पाणी शिरले. सगळे रस्ते पाण्याखाली आणि विजेअभावी काळोख. यामुळे अवघे नागपूर शहर ठप्प झाले. मुंबई शहरातून जशी मिठी नदी धावते तशीच नागपुरातून नाग नदी वाहते. शुक्रवारच्या पावसात ही नदी दुथडी भरून वाहू लागली.नाग नदीतील अतिक्रमणांमुळे पुराच्या पाण्याने पात्र सोडले आणि हे पाणी शहरभर पसरले. शिवाय, शहरातील सगळ्या गटारी चोकअप! तुंबलेल्या गटारांनी नागपूरची परिस्थिती आणखी बिकट केली.