1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (15:22 IST)

निर्भयाच्या दोषींची फाशी कायम

Death sentence convicts continue
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात मागील वर्षी ५ मे रोजी चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानेही या सगळ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
 
दोषींना फाशी मिळाल्यावरच देशाला दिलासा मिळेल अशी भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली. सरकारी वकिलांनी या प्रकरणातल्या दोषींना दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे अपील केले होते. ते मान्य करत सुप्रीम कोर्टानेही या चौघांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे.