शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 11 जुलै 2018 (11:10 IST)

खासदारांनी आत्परीक्षण करण्याची वेळ आली आहे : सुमित्रा महाजन

गेल्या काही अधिवेशनांमध्ये संसदेचा भरपूर वेळ गोंधळामुळे वाया गेल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना एक भावनिक शब्दांमध्ये पत्र लिहिले आहे.
 
पुढील आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बहुतांश वेळ घोषणाबाजी आणि गदारोळात गेल्यामुळे व्यथित झालेल्या महाजन यांनी खासदारांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत.
 
संसद चालू देणे हे खासदारांची नैतिक जबाबदारी आहे याची आठवण महाजन यांनी या पत्रामधून करुन दिली आहे. सर्व खासदारांनी आता आत्परीक्षण करण्याची वेळ असून संसद आणि लोकशाहीची भविष्यातील काय प्रतिमा असेल हे ठरवण्याचीही ही वेळ आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याची प्रतिष्ठा काय ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सभागृहात अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येणे, घोषणा देणे, फलक दाखवणे असेही प्रकार केले जातात. त्याबाबत महाजन यांनी या पत्रात चिंता व्यक्त केली असून आगामी अधिवेशनात सर्व लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
18 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून ते 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.