शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (09:34 IST)

नगर शिवसैनिक हत्याकांड उज्ज्वल निकम वकील नियुक्त

अहमदनगर येथील केडगाव परिसरात शिवासैनिक हत्याकांडात संजय कोतकर, वसंत ठुबे यांचा हत्येच्या घटनेतील आरोपींवर घातक कारवाया प्रतिबंधक कयद्याखाली (एमपीडीए), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याचे (मोक्का) अतर्गंत कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार निलम गोऱ्हे, तसेच कोतकर व ठुबे कुटुंबीयांनीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट दिली आहे. त्यात निवेदनाद्वारे मागण्या पुढे केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या खटल्याच्या संदर्भात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगतले आहे, 
 
निवेदन असे आहे की - 
 
नगर मनपाच्या प्रभाग ३२ च्या पोटनिवडणूकीच्या प्रचारा दरम्यान दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी शिवसैनिक व नातेवाईक जमा झाल्यावर त्या ठिकाणाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तेथे काही गुंड जमा होऊन दगडफेक करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी आमदार संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले यांची जामिनावर मुक्तता झाल्याने दबाव आणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत होता. याप्रकरणी निःपक्षातीपणे कारवाई करण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. या घटनेतील गुन्हेगारांवर घातक कारवाया प्रतिबंधक कयद्याखाली (एमपीडीए) किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याचे (मोक्का)अतर्गंत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.