मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (16:10 IST)

हा तर 'अमूला' राज्यात घुसवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

राज्यात सुरु असलेले दूध आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनाबाबत माहिती असतानाही सरकारने संबंधित संघटना आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. यामुळे राज्य सरकारला नक्की काय करायचे आहे? राज्यात अमूलसह इतर दूधसंघांना घुसवण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. तसेच महाराष्ट्राचा कारभार केंद्रातून चालवला जात असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. 
 
राज्य सरकार वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करतेय मात्र आधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, जर बाहेरच्या मुलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न झाला तर त्या विद्यार्थ्यांवर  बारीक लक्ष राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.