मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (15:15 IST)

मराठी बिग बॉसचे घर प्रेक्षकांच्या भेटीला

big boss marathi
बिग बॉसचे मराठमोळं घर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपणही बिग बॉसच्या घरात जावे अशी अनेकांची इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.
 
बिग बॉस मराठीचे घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे. आणि याच घराचे प्रतिरूप बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्याद्वारे प्रेक्षकसुध्दा बिग बॉस मराठीचे घर बघू शकतील. आता हेच बिग बॉस मराठीचे घर तुमच्या शहरामध्ये थेट तुमच्या भेटीला. कलर्स मराठी बिग बॉस मराठीचे घर बघण्याची एक सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या तमाम चाहत्यांना मिळणार आहे. बिग बॉस मराठीचे हे घर बसच्या रुपात महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे. ही बस नगर, बीड, परभणी,हिंगोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, वाशीम, संभाजीनगर आदी शहरांमध्ये फिरणार आहे. 
 
बिग बॉसचे हे सुंदर घर एका बसमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये घरातील गार्डन एरिया, लिव्हींग रूम आणि कन्फेशन रूम हुबेहूब तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच बिग बॉस मराठीच्या घराचे प्रतिरूप बघण्याची उत्सुकता असेल.