शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दिगांगनाला करायचेय सलमानबरोबर काम

खूप कमी वयामध्ये छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात करणारी अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिने आता छोट्या पडाला जवळपास टाटा बाय बायच केले आहे. कारण आता तिला केवळ चित्रपटांमध्येच काम करायचे आहे व खासकरून सलमान खानबरोबर काम करण्याची तिची इच्छा आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना दिगांगना म्हणाली की, आता मला आपले करिअर केवळ चित्रपटांमध्येच करायचे आहे. त्यामुळे गेले काही दिवस मी छोट्या पडद्यावर काम करत आहे व हे पाऊल मी सलमान सरांमुळे उचलले आहे. सलमान सरांच्या सांगण्यावरून मी चित्रपटासाठी लूक तयार केला व आता मला चित्रपटही मिळू लागले आहेत. छोट्या पडावरील माझे प्रेम यामुळे काही कमी झालेले नाही. उलट मला जेव्हा वाटेल तेव्हा मी छोट्या पडद्यावर काम करू शकते, परंतु चित्रपटासाठी मला यापासून थोडे अंतर ठेवावे लागणार आहे. दरम्यान, सलमानबरोबर एखादा चित्रपट करत आहेस का? अशी विचारणा केल्यावर दिगांगना म्हणाली, अद्याप तरी नाही, परंतु मला त्यांच्याबरोबर काम करायचे आहे. तूर्तास दिगांगना गोविंदाबरोबर फ्रायडेशिवाय जलेबी नावाच्या अन्य एका चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.