1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

प्रिया प्रकाश वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, हैदराबाद आणि मुंबईत नोंदवलेली एफआयआर रद्द

priya prakash varrier
मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. डोळा मारणार्‍या व्हिडिओमुळे चर्चेचा विषय झालेल्या प्रिया विरुद्ध हैदराबाद आणि मुंबई येथे एक एफआईआर नोंदवण्यात आली होती. तिच्या एका गाण्यात 'ओरु अदार लव..' मुळे तिच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
 
ज्या गाण्यामुळे वाद निर्माण झाला ते गाणं केरळच्या मालाबार भागातील एक पारंपरिक मुस्लिम गीत आहे. हे गाणं पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या पहिली पत्नी खदीजा यांच्यात प्रेमाचे वर्णन आणि प्रशंसा दर्शवतं. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तेलंगण, रजा अकादमी आणि जन जागरण समितीने मुसलमानांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचवली गेली म्हणून प्रिया विरुद्ध एफआईआर नोंदवली होती.
 
याचिकेत म्हटले गेले होते की तेलंगण आणि महाराष्ट्रामध्ये गाण्याची चुकीच्या व्याख्येच्या आधारावर विभिन्न समूहांद्वारे फौजदारी तक्रारी दाखल केली गेली आहे आणि या प्रकाराची तक्रार इतर गैर-मल्ल्याळम भाषिक राज्यांमध्ये नोंदवली जाऊ शकते.