शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

महिलेने तोडले पाणीपुरी खाण्याचे विक्रम

पाणीपुरी न खाल्लेली व्यक्ती कदाचित शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. एका महिलेने तर पाणीपुरी खाण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. ही महिला ज्या पद्धतीने पाणीपुरी खातेय त्याप्रकारे पाणीपुरी खाण्याचा साधा विचारही तुम्ही कधी केला नसेल. 
 
सोशल मीडियावर अत्यंत विचित्र पद्धतीने पाणीपुरी खाणार्‍या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत जवळपास 20 लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हि महिला पाणीपुरीचा अक्षरक्ष: चुरा करते आणि तो चुरा मसाल्यासोबत मिक्स करून ती खाताना दिसते. तर पाणीपुरी सोबतचे पाणी ती दुसर्‍या ग्लासमधून पिते. पाणीपुरी संपताच ती धावत जावून आणखी पाणीपुरी घेऊन येते.
 
हा व्हिडिओ फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. तीन मिनिटांचा हा व्हिडिओ पाणीपुरी खाण्याच्या स्पर्धेतील असल्याचे दिसते. पाहायला कितीही विचित्र वाटत असला तरी आतापर्यंत 18 हजार लोकांनी हा व्हिडिओ आपल्या टाइमलाइनवर शेअर केला आहे.