गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:28 IST)

बुलेट ट्रेन विचार न करता घेतलेला निर्णय : शरद पवार

बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, विचार न करता याबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केली. बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्राला कमी होणार असतानाही महाराष्ट्र व गुजरातवर समान आर्थिक बोजा टाकण्याचा अन्याय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला कसा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बुलेट ट्रेनपेक्षाही हा मोठा निधी सध्याच्या रेल्वेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, चंद्रपूर-मुंबई रेल्वेसाठी किंवा पाटबंधाऱ्यांसाठी वापरला असता तर ते अधिक फायद्याचे ठरले असते अशी टिप्पणीही त्यांनी केली.

शरद पवार रविवारी विविध कार्यक्रमांसाठी नगरमध्ये आले होते. बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. सध्या रेल्वेची सुरक्षितता, स्वच्छता, गुणवत्ता, स्थानकांची व्यवस्था व प्रवाशांची सुविधा हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे पवार यांनी सांगितले.